आमच्याशी संपर्क साधा

आमच्या बातम्यांबद्दल काही शंका असल्यास किंवा आपल्या भागातील बातम्या/समस्या मांडण्यासाठी आपण खालील क्रमांकावर किंवा पत्त्यावर संपर्क साधू शकता: शिवाजी पांचाळ तळणीकर : 7888113134 राजेश्वर पोतदार : 7385938333 ईमेल: SatyamevJayteNo1.news@gmail.com पत्ता: कै. बळवंतराव सराफा मार्केट, नायगाव बाजार, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड.

हा ब्लॉग शोधा

kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.

ब्लॉग संग्रहण

Games

Sports

» »Unlabelled » राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन; 'ज्ञानभारतम्' अॅपवर माहिती अपलोड करा!


 विशेष प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर नांदेड, दि. २८ एप्रिल :- भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'ज्ञानभारतम्' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहीम १६ मार्च २०२६ पासून सुरू आहे. नागरिकांकडे असलेल्या हस्तलिखितांची माहिती 'ज्ञानभारतम्' या मोबाईल अॅपवर अपलोड करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारित होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. या हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे.

एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचे उद्दिष्ट केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खासगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधित संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहे. परंतू ही हस्तलिखिते स्वखुशीने शासनाकडे सुपूर्द करावायाची झाल्यास शासन स्वीकारणार आहे.

राज्यातील अंमलबजावणी आणि केंद्र या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत:

  • कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर (क्लस्टर केंद्र)

  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे (क्लस्टर केंद्र)

  • आनंद आश्रम संस्थान, पुणे (स्वतंत्र केंद्र)

  • भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे (स्वतंत्र केंद्र)

महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

"Gyan Bharatam" मोबाईल अॅपचा वापर या सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत "Gyan Bharatam" हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, तसेच एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी व वारसा संवर्धन संस्था यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

«
Next
नवीनतम पोस्ट
»
Previous
थोडे जुने पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Leave a Reply