देगलूर / नांदेड (विशेष प्रतिनिधी - राजेश्वर पोतदार, नायगांव):
देगलूर नगरपालिकेतील २०२३ पासूनच्या बांधकाम परवानग्या, ले-आऊट मंजुरी आणि गावठाण प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेतील कथित अनियमिततेचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. याप्रकरणी युवक काँग्रेसचे देगलूर शहराध्यक्ष विकास नरबागे यांनी केलेल्या तक्रारीची नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांनी दखल घेतली असून, त्यामुळे नगरपालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
अभियंत्यासह मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह:
या कथित गैरव्यवहार प्रकरणात नगरपालिकेचे अभियंता (इंजिनिअर) गणेश बोकरे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाच, त्यांच्या कामकाजाला मुख्याधिकारी नीलम कांबळे यांची प्रशासकीय मान्यता किंवा पाठबळ होते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बांधकाम परवानग्या, ले-आऊट मंजुरी आणि गावठाण प्रमाणपत्रांसाठी लाखो रुपये मोजल्यास सर्व काही नियमात बसवले जाते, अशी जोरदार चर्चा देगलूर शहरात सुरू आहे.
तक्रारीतून उपस्थित झालेले महत्त्वाचे प्रश्न:
देगलूर नगरपालिकेतून गावठाण प्रमाणपत्रे नेमकी कोणाच्या आदेशाने दिली गेली?
बांधकाम परवानग्या आणि ले-आऊट मंजुरी देताना शासनाच्या नियमांचे पालन झाले आहे का?
अभियंता गणेश बोकरे यांनी घेतलेल्या निर्णयांना मुख्याधिकारी नीलम कांबळे यांची लेखी किंवा प्रशासकीय मान्यता होती का?
वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशीची मागणी:
या संपूर्ण प्रकरणात केवळ अभियंत्यांचीच नव्हे, तर मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्या निर्णयांची आणि प्रशासकीय जबाबदारीचीही स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांच्याकडे करण्यात आली आहे. आता या चौकशीतून काय सत्य समोर येते, याकडे संपूर्ण देगलूरवासीयांचे लक्ष लागले आहे.
निर्भीड, निष्पक्ष आणि लोकाभिमुख पत्रकारिता – 'सत्यमेव जयते No 1 NEWS'
(बातमी संकलन: राजेश्वर पोतदार,



