धर्माबाद (विशेष प्रतिनिधी): दि. 29
येत्या १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. राजेश संभाजीराव पवार हे धर्माबाद शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते प्रशासकीय सोहळ्याला उपस्थित राहून मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेणार आहेत.
ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थिती:
शुक्रवार, दि. १ मे रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता तहसील कार्यालय, धर्माबाद येथे महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. याप्रसंगी आमदार राजेश पवार हे प्रमुख उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना देणार आहेत.
जनतेच्या अडीअडचणी आणि संवाद:
ध्वजारोहण सोहळा संपन्न झाल्यानंतर आमदार राजेश पवार हे शासकीय विश्रामगृह, धर्माबाद येथे सकाळी ८:३० ते १०:०० या वेळेत उपस्थित राहतील. यावेळी धर्माबाद शहर आणि परिसरातील नागरिक आपल्या प्रलंबित समस्या, अडीअडचणी किंवा विविध विकासकामांच्या संदर्भात आमदारांची भेट घेऊ शकतील. नागरिकांनी आपली निवेदने यावेळेत प्रत्यक्ष भेटून सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
"प्रशासकीय सोहळ्यासोबतच जनतेच्या समस्यांना न्याय देणे ही माझी प्राथमिकता आहे," असे मत आ. राजेश पवार यांनी व्यक्त केले आहे.
निर्भीड आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS'
(रिपोर्टर : राजेश्वर पोतदार, नायगाव





कोणत्याही टिप्पण्या नाहीत: