#विधानपरिषद_निवडणूक #नोडल_अधिकारी_प्रशिक्षण #नांदेड_प्रशासन #सत्यमेव_जयते_न्यूज
नांदेड/नायगाव (विशेषप्रतिनिधी): २३ मे २०२६ महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या निवडणुकीच्या यशस्वी व पारदर्शक नियोजनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकारी आणि त्यांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण काल, २२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे उत्साहात पार पडले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कडक सूचना: या प्रशिक्षण सत्रात बोलताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मा. श्री. राहुल कर्डिले यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना निवडणुकी संदर्भातील सोपविलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये अधिक काटेकोरपणे व कोणत्याही त्रुटीशिवाय पार पाडण्याच्या कडक सूचना दिल्या. आचारसंहितेचा काळ असल्याने प्रशासकीय स्तरावर कमालीची सतर्कता बाळगण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती: या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणावेळी अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनमंत कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्यासह सर्व विभागांचे नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.
⚙️ निवडणुकीसाठी खालील प्रमुख कक्षांची स्थापना: निवडणुकीचे कामकाज अधिक सुलभ, अचूक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी विविध विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली असून, प्रत्येक कक्षासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
आचारसंहिता कक्ष आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रण.
प्रशिक्षण व्यवस्थापन आणि माहिती व्यवस्थापन कक्ष.
नामनिर्देशन (Nomination) व मतदार यादी आणि मतदान केंद्र व्यवस्थापन.
मतपत्रिका छपाई, वाटप तसेच मतपेटी व मतदान साहित्य वाटप कक्ष.
स्ट्राँग रूम आणि मतमोजणी व्यवस्थापन.
उमेदवार व राजकीय पक्ष निवडणूक खर्च तपासणी आणि नियंत्रण कक्ष.
वाहन अधिग्रहण, वाहतूक व्यवस्थापन व संगणकीकरण व्यवस्थापन कक्ष.
या सर्व कक्षांच्या नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली राष्ट्रीय कर्तव्ये अत्यंत सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले. निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी विविध कक्ष तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष कामकाजाबाबत आणि जबाबदाऱ्यांविषयी सविस्तर सादरीकरण केले.
निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS' (रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नायगाव/नांदेड)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत: