आमच्याशी संपर्क साधा

आमच्या बातम्यांबद्दल काही शंका असल्यास किंवा आपल्या भागातील बातम्या/समस्या मांडण्यासाठी आपण खालील क्रमांकावर किंवा पत्त्यावर संपर्क साधू शकता: शिवाजी पांचाळ तळणीकर : 7888113134 राजेश्वर पोतदार : 7385938333 ईमेल: SatyamevJayteNo1.news@gmail.com पत्ता: कै. बळवंतराव सराफा मार्केट, नायगाव बाजार, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड.

हा ब्लॉग शोधा

kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.

ब्लॉग संग्रहण

Games

Sports

» »Unlabelled » आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा! स्व. चरकुलवार यांच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनी कासराळी परिसरात महा आरोग्य यज्ञ.


 #महा_आरोग्य_शिबीर #कासराळी_वृत्त #सत्यमेव_जयते_न्यूज

नायगाव (विशेष प्रतिनिधी): १७ मे २०२६ सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे स्वर्गीय गंगारामजी चरकुलवार यांच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून कासराळी आणि परिसरातील नागरिकांसाठी भव्य महा आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील शेकडो महिला व पुरुष रुग्णांनी उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

मान्यवरांचे प्रतिपादन व उपस्थिती: या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजप नेते मा. श्री. बालाजी बच्चेवार यांनी उपस्थितांना आरोग्य शिबिरांचे महत्त्व अतिशय सविस्तरपणे पटवून दिले. "ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार मिळवून देणे हीच स्वर्गीय गंगारामजी चरकुलवार यांना खरी श्रद्धांजली आहे," असे गौरवद्गार त्यांनी काढले.

या शिबिरास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री. चैतन्य बापू देशमुख, गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई हेमंत पाटील, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा ज्येष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार, वरिष्ठ भाजपा नेते श्री. श्रावण पाटील भिलवंडे, उद्योजक भागवत लोकमान्यवार आणि उद्योजक श्री. ज्ञानेश्वर लोकमान्यवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: या महा आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर मंडळींसह डॉ. तुषार सुरवसे, डॉ. अभीजीत तरटे व त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार व सल्ला दिला.

या कार्यक्रमाला व्यंकटराव पाटील चव्हाण, चंदू पाटील चव्हाण, संजय पाटील मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील हायगले, शंकरराव काळे, बाबुराव चरकुलवाड, व्यंकट पाटील खतगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय करंदीकर, उमाकांत बामणीकर यांसह कासराळी परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी व चरकुलवार परिवाराने विशेष परिश्रम घेतले.


निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS'  

(रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नायगाव)

«
Next
नवीनतम पोस्ट
»
Previous
थोडे जुने पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Leave a Reply