आमच्याशी संपर्क साधा

आमच्या बातम्यांबद्दल काही शंका असल्यास किंवा आपल्या भागातील बातम्या/समस्या मांडण्यासाठी आपण खालील क्रमांकावर किंवा पत्त्यावर संपर्क साधू शकता: शिवाजी पांचाळ तळणीकर : 7888113134 राजेश्वर पोतदार : 7385938333 ईमेल: SatyamevJayteNo1.news@gmail.com पत्ता: कै. बळवंतराव सराफा मार्केट, नायगाव बाजार, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड.

हा ब्लॉग शोधा

kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.

ब्लॉग संग्रहण

Games

Sports

» »Unlabelled » 🔥 नायगावात माती-मुरमाचा 'कहर'; महसूल प्रशासन 'कोमात' तर उत्खनन माफिया 'जोमात'!

 

#अवैध_उत्खनन_माफियांचा_नायगावात_धुमाकूळ

नायगाव (प्रतिनिधी: निळकंठ जाधव): नायगाव तालुक्यात सध्या महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने माती आणि मुरूम उत्खननाने उग्र रूप धारण केले आहे. विशेषतः गोदावरी काठावरील बरबडा महादेव मंदिर परिसरात रात्रंदिवस सुरू असलेल्या या अवैध उपशामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असून, प्रशासकीय यंत्रणा मात्र 'अर्थपूर्ण' शांतता बाळगून असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.

राजकीय नेत्याचा पडद्याआड खेळ: मिळालेल्या माहितीनुसार, मुंडकर यांच्या नावाने केवळ २०० ब्रासची परवानगी घेऊन प्रत्यक्षात हजारो ब्रास मातीचे उत्खनन केले जात आहे. महायुतीमधील एका वादग्रस्त जिल्हाप्रमुखाने आपले नातेवाईक पुढे करून पडद्यामागून हे 'काळे कारस्थान' सुरू ठेवले आहे. एकीकडे पर्यावरणाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे पर्यावरणाचीच धूळधाण करायची, असा दुहेरी चेहरा या नेत्याने उघड केला आहे.

महसूल प्रशासन कोमात, पोलीस गप्प: या अवैध प्रकारावर कारवाई करण्याऐवजी महसूल विभाग चूप असून पोलीस खातेही बघ्याची भूमिका घेत आहे. तहसीलदार गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर आता थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या काळात अवैध उत्खननाला उधाण आल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तक्रार करणाऱ्या सामान्य नागरिकांना अब्रुनुकसानीच्या धमक्या देणारे अधिकारी, बड्या माफियांना मात्र पायघड्या घालत असल्याचे विदारक चित्र नायगावात दिसत आहे.

प्रशासनाची 'आर्थिक' मिलीभगत? तालुक्यात चर्चा आहे की, महसूल प्रशासनाची ही 'मुख्य संपत्ती' असून पोलिसांसाठी ही 'आर्थिक संपत्ती' ठरत आहे. कायदा सर्वांसाठी समान असताना राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ही मोकळीक का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या उत्खननामुळे शेतजमीन आणि रस्त्यांचे अतोनात नुकसान होत असून, निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.

चौकट: कारवाईचा सवाल; प्रशासन झोपेतच! नायगाव तालुक्यातील या उघड माथ्याने सुरू असलेल्या लुटीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन दोषी अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर कठोर कारवाई होणार का? की प्रशासन अजूनही कुणाच्या दबावाखाली झोपेतच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS' (रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नायगाव)

«
Next
नवीनतम पोस्ट
»
Previous
थोडे जुने पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Leave a Reply