[संपादकीय बातमी राजेश्वर पोतदार] : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुदखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुदखेड पंचायत समितीच्या अधिकृत वेबसाईटचे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, स्वतःची स्वतंत्र वेबसाईट असणारी मुदखेड ही नांदेड जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.
मान्यवरांची उपस्थिती: या ऐतिहासिक सोहळ्याला आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुदखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. विश्रांतीताई माधवराव पाटील कदम आणि माधवराव पाटील कदम यांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रशासकीय पुढाकार: हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुदखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (BDO), सर्व विभागांचे विस्तार अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटन प्रसंगी गट विकास अधिकाऱ्यांनी वेबसाईटच्या कार्यप्रणालीची माहिती देऊन ही सुविधा नागरिकांच्या सेवेसाठी कशी उपयुक्त ठरेल, याचे सादरीकरण केले.
वेबसाईटचे वेगळेपण: या वेबसाईटमुळे तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजना, अर्जांचे नमुने, आणि विकासकामांची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी या डिजिटल व्यासपीठाचा मोठा उपयोग होईल.
आमदार श्रीजयाताई चव्हाण आणि उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल गट विकास अधिकारी व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले.
- वृत्त संकलन: सत्यमेव जयते No. 1 न्यूज





कोणत्याही टिप्पण्या नाहीत: