आमच्याशी संपर्क साधा

आमच्या बातम्यांबद्दल काही शंका असल्यास किंवा आपल्या भागातील बातम्या/समस्या मांडण्यासाठी आपण खालील क्रमांकावर किंवा पत्त्यावर संपर्क साधू शकता: शिवाजी पांचाळ तळणीकर : 7888113134 राजेश्वर पोतदार : 7385938333 ईमेल: SatyamevJayteNo1.news@gmail.com पत्ता: कै. बळवंतराव सराफा मार्केट, नायगाव बाजार, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड.

हा ब्लॉग शोधा

kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.

ब्लॉग संग्रहण

Games

Sports

» »Unlabelled » नायगावकरांच्या समस्या सुटणार! खासदार रवींद्र चव्हाण आणि आमदार राजेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे आयोजन.

 

नायगाव (संपादकीय बातमी राजेश्वर पोतदार): ८ मे २०२६ नायगाव तालुक्यातील नागरिकांच्या महसुली समस्या निकाली काढण्यासाठी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. नायगाव (बा.) येथील तहसील कार्यालयाजवळील बहुउद्देशीय सभागृहात सकाळी १० वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात झाली आहे.

प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन: या शिबिराचे उद्घाटन नांदेडचे खासदार मा. श्री. रवींद्रजी चव्हाण आणि नायगाव विधानसभेचे आमदार मा. श्री. राजेशजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले (भा.प्र.से.), उपविभागीय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे आणि तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल यंत्रणा या ठिकाणी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सज्ज आहे.

एकाच ठिकाणी मिळणार या सेवा: या शिबिरामध्ये नागरिकांना खालील महत्त्वाच्या सेवा तात्काळ मिळणार आहेत:

  • प्रलंबित फेरफार आणि ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती.

  • उत्पन्न, रहिवासी, जातीचे आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र.

  • डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उतारा वाटप.

  • अकृषिक (N.A.) परवानगी आणि नवीन नियमांनुसार 'सनद' प्रक्रियेची माहिती.

  • पीएम किसान नोंदणी, घरांसाठी पट्टे वाटप आणि ई-मोजणी अर्ज.

  • कृषी, आरोग्य, वन आणि पंचायत विभागाशी संबंधित विविध सेवा.

नागरिकांना आवाहन: "सरकारी काम आणि चकरा मारणे" ही पद्धत बंद करून प्रशासन स्वतः जनतेच्या दारी आले आहे. तरी नायगाव परिसरातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी, मंडळ नायगाव (बा.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.


निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS' (रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नायगाव)

«
Next
नवीनतम पोस्ट
»
Previous
थोडे जुने पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Leave a Reply