#प्रशासनाची_माहिती #माहिती_हीच_शक्ती
नायगाव ( संपादकीय बातमी राजेश्वर पोतदार ): तालुका पातळीवर सरकारी यंत्रणेचा कणा म्हणून 'तहसीलदार' यांच्याकडे पाहिले जाते. जमीन महसूल, कायदा-सुव्यवस्था आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी तहसीलदार यांच्या खांद्यावर असते. अनेकदा नागरिकांना तहसीलदारांचे नेमके अधिकार आणि कामे माहीत नसतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत तहसीलदारांची कामे, अधिकार आणि कर्तव्ये खालीलप्रमाणे आहेत:
🔹 मुख्य कामे व जबाबदाऱ्या: १. जमीन नोंदी व फेरफार नियंत्रण: शेतजमिनीचे ७/१२, ८-अ चे उतारे आणि फेरफार (Mutation) प्रकरणांवर नियंत्रण ठेवणे व वाद मिटवणे. २. महसूल वसुली: शासनाचा महसूल, कर आणि दंडाची वसुली करणे. ३. नियंत्रण व देखरेख: तालुक्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी (Circle Officer) यांच्या कामकाजावर प्रत्यक्ष देखरेख ठेवणे. ४. आपत्ती व्यवस्थापन: पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून थेट मदत वाटपाचे समन्वय साधणे.
🔹 महत्त्वाचे अधिकार (Powers):
न्यायालयीन अधिकार: महसूल प्रकरणांमध्ये न्यायाधीशांप्रमाणे सुनावणी घेऊन निर्णय देणे (उदा. वारसा हक्क, वहिवाट रस्ते किंवा ७/१२ वरील नोंदींचे वाद).
अधिकार मर्यादा: तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप असल्यास, त्याविरुद्ध उपविभागीय अधिकारी (SDO) किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector) अपील करता येते.
🔹 नागरिकांप्रती कर्तव्ये:
तालुक्यातील नागरिकांना वेळेत विविध दाखले (उत्पन्न, जात, रहिवासी) मिळवून देणे.
शासकीय योजनांची तळागाळातील लोकांपर्यंत पारदर्शक अंमलबजावणी करणे.
तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला साहाय्य करणे.
निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS' (माहिती व जनजागृती विभाग)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत: