आमच्याशी संपर्क साधा

आमच्या बातम्यांबद्दल काही शंका असल्यास किंवा आपल्या भागातील बातम्या/समस्या मांडण्यासाठी आपण खालील क्रमांकावर किंवा पत्त्यावर संपर्क साधू शकता: शिवाजी पांचाळ तळणीकर : 7888113134 राजेश्वर पोतदार : 7385938333 ईमेल: SatyamevJayteNo1.news@gmail.com पत्ता: कै. बळवंतराव सराफा मार्केट, नायगाव बाजार, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड.

हा ब्लॉग शोधा

kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.

ब्लॉग संग्रहण

Games

Sports

» »Unlabelled » वंजारवाडीवर शोककळा: कुंटूर तांडा आश्रम शाळेचे कर्मचारी रावसाहेब वाघमारे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन!


 #शोकसंदेश #रावसाहेब_वाघमारे_निधन #वंजारवाडी_शोककळा #कुंटूर_तांडा_आश्रमशाळा #सत्यमेव_जयते

नायगांव (विशेष प्रतिनिधी): ०२ जून २०२६ नायगांव तालुक्यातील मौजे वंजारवाडी येथील रहिवासी आणि कुंटूर तांडा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष कर्मचारी रावसाहेब गंगाराम वाघमारे (वय ५५ वर्षे) यांचे सोमवार, दिनांक १ जून २०२६ रोजी मध्यरात्री २:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. एका प्रामाणिक, सेवाभावी आणि मनमिळाऊ कर्मचाऱ्याच्या अकाली जाण्याने वंजारवाडी आणि कुंटूर तांडा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ते नायगांव तालुक्यातील प्रसिद्ध ग्राम विकास अधिकारी प्रकाश वाघमारे यांचे मोठे बंधू होत.

प्रामाणिक सेवा आणि सामाजिक पिंड: रावसाहेब वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून कुंटूर तांडा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत आपली सेवा बजावत होते. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहतानाच त्यांचा सामाजिक पिंड देखील मोठा होता. अत्यंत शांत, सुस्वभावी आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणाऱ्या मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी समाजात स्वतःचा एक मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता.

कुटुंबाचा मोठा आधार हरपला: त्यांच्या निधनामुळे वाघमारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून आणि नातू असा मोठा आणि सुशिक्षित परिवार आहे. कुटुंबाचा हा मुख्य आधार काळाने हिरावून घेतल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.

अश्रूभाब्या वातावरणात अंत्यसंस्कार संपन्न: रावसाहेब वाघमारे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणल्यानंतर, काल दिनांक १ जून रोजी दुपारी ठीक १:०० वाजता त्यांच्या स्वतःच्या शेतात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी वाघमारे परिवाराचे सांत्वन करण्यासाठी आणि दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पंचायत समिती सदस्य संभाजी शेळके, ग्रामसेवक संघटनेचे तालुका सचिव सूर्यकांत बोंडले, लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते रावसाहेब पवार, निष्ठावंत कार्यकर्ते गणपत रेड्डी, रामदास कांबळे, शिक्षक महादवाड यांच्यासह कुंटूर तांडा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार आणि वंजारवाडी येथील समस्त ग्रामस्थ, महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'सत्यमेव जयते No 1 NEWS' परिवाराच्या वतीने दिवंगत रावसाहेब वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! (रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नायगांव)

«
Next
नवीनतम पोस्ट
»
Previous
थोडे जुने पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Leave a Reply