आमच्याशी संपर्क साधा

आमच्या बातम्यांबद्दल काही शंका असल्यास किंवा आपल्या भागातील बातम्या/समस्या मांडण्यासाठी आपण खालील क्रमांकावर किंवा पत्त्यावर संपर्क साधू शकता: शिवाजी पांचाळ तळणीकर : 7888113134 राजेश्वर पोतदार : 7385938333 ईमेल: SatyamevJayteNo1.news@gmail.com पत्ता: कै. बळवंतराव सराफा मार्केट, नायगाव बाजार, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड.

हा ब्लॉग शोधा

kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.

ब्लॉग संग्रहण

Games

Sports

» »Unlabelled » नांदेड राजकीय भूकंप: वडिलांच्या पक्षांतराचा पुत्राला फटका? कृष्णा पाटील आष्टीकरांना केवळ ८४ मते; राजूरकरांच्या विजयाने महायुतीचा जल्लोष.

 

राजेश्वर पोतदार

नांदेड (विशेष प्रतिनिधी): २२ जून २०२६ संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या अत्यंत बहुचर्चित आणि चुरशीच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर भाजपचे अमरनाथ राजूरकर यांनी एकतर्फी आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राजूरकर यांनी तब्बल ३३९ मते घेत महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांचा धुव्वा उडवला. आष्टीकर यांना केवळ ८४ मते मिळवता आली, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांना अवघ्या ५ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे एकूण ४५१ मतांपैकी २३ मते बाद ठरली आहेत.

आज सकाळी ८ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीपासूनच भाजपचे अमरनाथ राजूरकर यांनी घेतलेली मोठी आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासोबतच राजूरकर यांनी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवत आपली 'विजयाची हॅट्रिक' साजरी केली आहे.

चव्हाण-चिखलीकर एकत्र आल्याचा मोठा फायदा! नांदेड विधान परिषदेची ही जागा महायुतीत कुणाला सुटणार, यावरून मोठी चुरस निर्माण झाली होती. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे ही जागा भाजपला सोडवण्यासाठी आग्रही होते, तर राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही दावा केला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींनी ही जागा भाजपच्या पारड्यात टाकत माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे खा. अशोकराव चव्हाण आणि आ. प्रतापराव चिखलीकर हे सर्व हेवेदावे विसरून पक्षासाठी एकत्र आले. या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या ताकदीमुळे ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी झाली.

खासदार आष्टीकरांचे पक्षांतर आणि पुत्राचा पराभव: या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अचानक ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीकडून (ठाकरे गट) रिंगणात होते. काँग्रेसनेही ऐनवेळी त्यांच्यासाठी माघार घेतली होती. मात्र, मतदानाच्या काही दिवस आधी वडिलांनीच सत्ताधारी महायुतीत प्रवेश केल्याने मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा थेट फटका कृष्णा आष्टीकर यांना बसल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.

अमरनाथ राजूरकर यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना दोन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला होता, तर आता भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. राजूरकर यांच्या या दणदणीत विजयानंतर नांदेड जिल्ह्यात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष सुरू केला असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS' (रिपोर्ट: , नांदेड)

«
Next
नवीनतम पोस्ट
»
Previous
थोडे जुने पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Leave a Reply