आमच्याशी संपर्क साधा

आमच्या बातम्यांबद्दल काही शंका असल्यास किंवा आपल्या भागातील बातम्या/समस्या मांडण्यासाठी आपण खालील क्रमांकावर किंवा पत्त्यावर संपर्क साधू शकता: शिवाजी पांचाळ तळणीकर : 7888113134 राजेश्वर पोतदार : 7385938333 ईमेल: SatyamevJayteNo1.news@gmail.com पत्ता: कै. बळवंतराव सराफा मार्केट, नायगाव बाजार, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड.

हा ब्लॉग शोधा

kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.

ब्लॉग संग्रहण

Games

Sports

» »Unlabelled » 🚨 "शाळा बंद करा नाहीतर शिकवणी वर्ग!" खाजगी शिकवणीच्या बाजारावरून विधिमंडळात बच्चू कडूंचा सरकारला संतप्त सवाल; शिक्षण कायद्यात बदलाची आग्रही मागणी.


विशेष विधानसभा रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नांदेड

मुंबई/नांदेड (विशेष प्रतिनिधी): ७ जुलै २०२६
देशात आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या शिक्षण व्यवस्थेच्या बाजारीकरणावर आणि सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या खाजगी शिकवणी (Coaching Classes) वर्गांच्या मनमानी कारभारावर आज विधिमंडळात आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. "सध्या राज्यात शाळा आणि खाजगी शिकवणी वर्ग असा दुहेरी धंदा सुरू असून, एक म्यानमध्ये दोन तलवारी चालू शकत नाहीत. त्यामुळे सरकारने एकतर शाळा बंद कराव्यात किंवा खाजगी शिकवणी वर्ग अधिकृत करावेत," असा संतप्त सवाल आमदार बच्चू कडू यांनी सभागृहात उपस्थित केला.
​या संदर्भातील सविस्तर चर्चेदरम्यान त्यांनी शिक्षण क्षेत्रातील वाढत्या 'बाजारू' प्रवृत्तीवर कडक शब्दांत प्रहार केला.
​
 "श्रीमंतांना बिस्लेरी अन् गरिबांना अशुद्ध पाणी का?"
सभागृहात आपली बाजू मांडताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, "आज शाळांमध्येही शिक्षण मिळते आणि खाजगी क्लासमध्येही शिक्षण मिळते. हे म्हणजे एका बाजूला साधं पाणी मिळणे आणि दुसऱ्या बाजूला बिस्लेरीचे पाणी मिळण्यासारखे आहे. तुम्ही काय गरिबाच्या पोराला अशुद्ध पाणी आणि आमदाराच्या, श्रीमंताच्या पोराला शुद्ध बिस्लेरीचे पाणी देणार का?" रामदेव बाबांच्या मिरची पावडरचे उदाहरण देत त्यांनी कॉर्पोरेट कंपन्यांमुळे स्थानिक बचत गटांचे उद्योग कसे धोक्यात आले, याकडे लक्ष वेधले आणि शिक्षण क्षेत्राची अवस्थाही तशीच होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
​
 बेरोजगारीतून सुरू झाला 'शिकवणीचा' नवा पाठ!
खाजगी क्लासेसच्या उगमस्थानवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा शिकवणीचा पाठ मुळात सुशिक्षित बेरोजगार युवकांमधून सुरू झाला आहे. अनेक गुणवत्ताधारक तरुण, ज्यांना शाळा-कॉलेजमध्ये ठराविक जागा आणि पैशांच्या (डोनेशन) अभावामुळे नोकऱ्या मिळत नाहीत, ते नाईलाजाने स्वतःचे शिकवणी वर्ग सुरू करतात. आज बाजारात ५० ते ६० लाखाला नोकऱ्या विकल्या जात असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला.
​🛡️ गरीब, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी कायद्यात संरक्षणाची मागणी:
आमदार बच्चू कडू यांनी सरकारकडे मागणी केली की, ज्या उच्चशिक्षित आणि गुणवत्ताधारक तरुण-तरुणींना नोकरी लागली नाही, त्यांच्यासाठी आणि गरीब, शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी या नव्या कायद्यात नेमकी काय सुरक्षितता निर्माण केली जाणार आहे? गुणवत्ता असूनही नोकरीपासून वंचित राहणाऱ्या बेरोजगारांना कायद्यात वाव (आरक्षण किंवा तरतूद) ठेवणार का, असा सुचक प्रश्न त्यांनी मंत्र्यांना विचारला.
​
'सत्यमेव जयते'चे विश्लेषण: शिक्षणाचा बाजार उठणार का?
​आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केलेले प्रश्न आज प्रत्येक सामान्य पालकांच्या मनातील आहेत. शाळांमध्ये लाखो रुपये फी भरूनही जर मुलांना पुन्हा खाजगी क्लासेस लावावे लागत असतील, तर मूळ शिक्षण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. आता यावर सरकार काय कडक पावले उचलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
​निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS'

«
Next
नवीनतम पोस्ट
»
Previous
थोडे जुने पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Leave a Reply