विशेष ग्राऊंड रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नायगांव
नायगाव/नांदेड (विशेष प्रतिनिधी): ७ जुलै २०२६
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील खैरगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक अत्यंत अनोखे 'एलईडी स्क्रीन' आंदोलन सुरू आहे. खैरेगावातील अपूर्ण विकासकामे, नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी आणि प्रशासनाची अनास्था यांचे थेट पुरावे आंदोलकांनी उपोषण स्थळी भव्य स्क्रीन लावून जाहीर केले आहेत.
या आंदोलनाचे नेतृत्व खैरगावचे सुपुद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय सोनकांबळे करत असून, त्यांच्यासोबत खैरगावचे असंख्य ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
१. खैरगाव ग्रामपंचायतीमधील २०२० ते २०२६ या कालावधीतील सर्व विकास निधीच्या खर्चाची अत्यंत निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी.
२. माहितीच्या अधिकारांतर्गत (RTI) ग्रामस्थांनी मागवलेली, परंतु प्रशासनाने वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवलेली माहिती तातडीने खैरगावच्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी.
३. कथित आर्थिक अनियमितेत दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
"जोपर्यंत खैरगावच्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत नायगाव तालुक्याचा हा लढा आणि हे बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असेच सुरू राहील," असा ठाम इशारा खैरगावच्या ग्रामस्थांनी 'सत्यमेव जयते न्यूज'शी बोलताना दिला आहे.
नायगाव तालुक्यातील प्रत्येक घडामोडींच्या वेगवान अपडेट्ससाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS'




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: