नांदेड/किनवट (विशेष प्रतिनिधी): १८ ऑगस्ट २०२६
किनवट तालुक्यातील मौजे बोधडी (परिसर) येथे आदिवासी शेतकऱ्यांच्या शेवगा उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड देत उभारण्यात आलेल्या 'शेवगा पावडर प्रक्रिया युनिट' चा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, १७ ऑगस्ट रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. नांदेडचे जिल्हाधिकारी मा. राहुल कर्डिले यांच्या शुभहस्ते या नाविन्यपूर्ण प्रक्रिया युनिटचे लोकार्पण करण्यात आले.
हा महत्त्वाकांक्षी उपक्रम 'वनश्री आदिवासी शेतकरी उत्पादक गट बोधडी बु.' यांच्याकडे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट, कृषी विभाग तसेच अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प महाराष्ट्र (HIMWP-MH) यांच्या संयुक्त समन्वयातून साकारण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना:
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केवळ शेतीमालाचे उत्पादन वाढविणे पुरेसे नसून, त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन (Value Addition), दर्जेदार पॅकिंग आणि थेट बाजारपेठेशी जोडणी करणे गरजेचे आहे. याच दूरदृष्टीतून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. आदिवासी भागातील शेतकरी, महिला आणि युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरेल.
👥 मान्यवर अधिकारी व मार्गदर्शकांची उपस्थिती:
या सोहळ्यास सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी (किनवट) डॉ. बी. सरवनन हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
याशिवाय व्यासपीठावर:
श्री. कैलास जायभाये (संचालक, SBI RSETI, नांदेड)
डॉ. अशोक वडवळे (जिल्हा रेशीम अधिकारी)
श्री. विक्रांत देहानकर (राज्य समन्वयक, B.R.L.F., नागपूर)
डॉ. शारदा चोंडेकर (तहसीलदार, किनवट)
श्री. बाबुराव सोनकांबळे (एल.डी.एम., एस.बी.आय., नांदेड)
श्रीमती जयश्री वाघमारे (गटविकास अधिकारी, पं. स. किनवट)
श्री. प्रदीप नाईक (सहाय्यक प्रकल्प अधिकारी)
श्री. चंद्रकांत निमोड (तालुका कृषी अधिकारी, किनवट)
श्री. तुषार पाटील (प्रकल्प संचालक, RAES शाखा किनवट)
यांच्यासह शेतकरी उत्पादक गटांचे सदस्य, रेशीम उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📜 ६० रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप:
याच कार्यक्रमाच्या औचित्याने १७ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या २ रेशीम प्रशिक्षण वर्गांतील एकूण ६० रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
निर्भीड, निष्पक्ष आणि शेतकरी-ग्रामीण विकासाचा वेध घेणाऱ्या बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS'
(विशेष कृषी व ग्रामीण अहवाल: राजेश्वर पोतदार, किनवट/नांदेड - ७३८५९३८३३३ / ७८८८११३१३४)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: