आमच्याशी संपर्क साधा

आमच्या बातम्यांबद्दल काही शंका असल्यास किंवा आपल्या भागातील बातम्या/समस्या मांडण्यासाठी आपण खालील क्रमांकावर किंवा पत्त्यावर संपर्क साधू शकता: शिवाजी पांचाळ तळणीकर : 7888113134 राजेश्वर पोतदार : 7385938333 ईमेल: SatyamevJayteNo1.news@gmail.com पत्ता: कै. बळवंतराव सराफा मार्केट, नायगाव बाजार, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड.

हा ब्लॉग शोधा

kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.

ब्लॉग संग्रहण

Games

Sports

» »Unlabelled » नांदेड: पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा संपन्न; युवकांना स्वावलंबनाचे बळ!

 

नांदेड (संपादकीय बातमी राजेश्वर पोतदार): ३० एप्रिल महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आज नांदेड येथील शंकररावजी चव्हाण सभागृहात भव्य 'कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा' उत्साहात पार पडला.

मान्यवरांची मांदियाळी: कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. श्री. अतुलजी सावे यांनी भूषविले. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार मा. श्री. अशोकराव चव्हाण साहेब, खासदार मा. डॉ. अजित गोपछडे यांच्यासह नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. राजेश संभाजीराव पवार, आमदार बाबुराव कोहळीकर, महापौर कविताताई मुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

थेट लाभ आणि मार्गदर्शन: इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विविध महामंडळांच्या वतीने लाभार्थ्यांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, चारचाकी वाहने आणि कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. आमदार राजेश पवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत युवकांनी स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकावे, असे आवाहन केले.

उपस्थित मान्यवर व अधिकारी: या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघनाताई कावली, व्यवस्थापकीय संचालक डॉ. वसंत माने, महाज्योतीचे मिलिंद नारिंगे, ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक झुंजारे, संचालक सोनालीताई मुळे यांच्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निर्भीड आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS' (रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नायगाव)

«
Next
नवीनतम पोस्ट
»
Previous
थोडे जुने पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Leave a Reply