#अभिनंदन_व_सत्कार_खासदार #काँग्रेस_जिल्हाध्यक्ष #नायगाव_नगरपंचायत
नायगाव (विशेष प्रतिनिधी): २२ मे २०२६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी जिल्ह्याचे लोकप्रिय युवा खासदार मा. श्री. रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या निवडीबद्दल आणि त्यांच्यावर पक्षाने सोपवलेल्या मोठ्या संघटनात्मक जबाबदारीबद्दल नायगाव नगरपंचायतीच्या वतीने खासदार साहेबांचा यथोचित गौरव आणि भव्य सत्कार करण्यात आला.
नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांकडून भावी वाटचालीस शुभेच्छा: नायगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना संजय चव्हाण आणि उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पारडला. खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यासह तालुक्यात काँग्रेस पक्षाला आणि तरुण कार्यकर्त्यांना मोठी नवी ऊर्जा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नगराध्यक्षा अर्चनाताई चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण आणि उपस्थित मान्यवरांनी खासदार साहेबांना शाल, पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले आणि पुढील संघटनात्मक कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची मोठी उपस्थिती: या गौरव सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ नेते हनुमंतराव पाटील चव्हाण साहेब, श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार साहेबांच्या या निवडीबद्दल संपूर्ण नायगाव तालुक्यातून आणि राजकीय स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: