#नांदेड_इंधन_अपडेट #अफवांवर_विश्वास_ठेवू_नका #प्रशासकीय_खुलासा #सत्यमेव_जयते_न्यूज
नांदेड/नायगाव (विशेष प्रतिनिधी): २२ मे २०२६ नांदेड शहर आणि जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबतच्या चुकीच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती व गोंधळ निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र, नांदेड शहर तसेच संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमितपणे सुरू आहे. अचानकपणे डिझेलच्या मागणीत २५ ते ३० टक्के वाढ झाल्याने आणि नागरिकांनी भीतीपोटी 'पॅनिक खरेदी' सुरू केल्यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असा स्पष्ट खुलासा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी केला आहे.
जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन समस्येविषयी आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, तेल कंपन्यांचे विक्री अधिकारी आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) उपस्थित होते.
📊 १ हजार ९५१ केएल पेट्रोल तर २ हजार ७९ केएल डिझेल शिल्लक: जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असून संबंधित यंत्रणेमार्फत यावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ९५१ केएल (KL) पेट्रोल आणि २ हजार ७९ केएल (KL) डिझेलचा साठा प्रत्यक्ष उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.
⚠️ जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन व कडक सूचना:
सोशल मीडियावरील कोणत्याही अप्रमाणित अफवा किंवा चुकीच्या संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
भीतीपोटी एकाच वेळी जास्त प्रमाणात इंधन खरेदी करून त्याची साठवणूक करण्याचा धोकादायक प्रयत्न करू नये.
पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, ज्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
अफवा पसरवणे हा कायद्याने दंडनीय अपराध असून, सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
📱 तक्रार निवारण आणि संपर्क यंत्रणा: नागरिकांना पेट्रोल किंवा डिझेल पुरवठ्याबाबत काही तक्रारी अथवा शंका असल्यास त्यांनी प्रशासनाच्या अधिकृत माध्यमांशी संपर्क साधावा. यासाठी प्रशासनाने खालील यंत्रणा सज्ज केली आहे:
अधिकृत व्हॉट्सॲप चॅट बॉट सेवा (WhatsApp Chat Bot): 8668223326
ई-मेल आयडी: dsonanded1@gmail.com
📍 तालुकास्तरावरील संपर्क क्रमांक (अडचणीच्या वेळी संपर्क करा):
नायगाव - 7057002865 | नांदेड - 7030773040 | अर्धापूर - 8805068954
मुखेड - 9356806405 | धर्माबाद - 9421841447 | मुदखेड - 9445112782
उमरी - 8805447837 | बिलोली - 9637963222 | लोहा - 9356806405
हिमायतनगर - 8308073089 | हदगाव - 8805068954 | कंधार - 9823757345
माहूर - 9403184473 | किनवट - 9850296096 | भोकर - 8421183602 | देगलूर - 9423805064
जिल्ह्यात शांतता, संयम व सहकार्य राखावे आणि कोणत्याही अनुचित परिस्थितीला खतपाणी घालू नये, असे जाहीर आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS' (रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नायगाव/नांदेड)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत: