आमच्याशी संपर्क साधा

आमच्या बातम्यांबद्दल काही शंका असल्यास किंवा आपल्या भागातील बातम्या/समस्या मांडण्यासाठी आपण खालील क्रमांकावर किंवा पत्त्यावर संपर्क साधू शकता: शिवाजी पांचाळ तळणीकर : 7888113134 राजेश्वर पोतदार : 7385938333 ईमेल: SatyamevJayteNo1.news@gmail.com पत्ता: कै. बळवंतराव सराफा मार्केट, नायगाव बाजार, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड.

हा ब्लॉग शोधा

kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.

ब्लॉग संग्रहण

Games

Sports

» »Unlabelled » नायगाव बाजार: ज्येष्ठ नागरिक कै. व्यंकटराव रामचंद्र पांचाळ (ईकळीकर) यांचे दुःखद निधन

राजेश्वर पोतदार 
नायगाव बाजार (विशेष प्रतिनिधी): १६ सप्टेंबर २०२६
विश्वकर्मा नगर, नायगाव बाजार येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक कै. व्यंकटराव रामचंद्र पांचाळ (ईकळीकर) यांचे आज बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नायगाव शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
आपल्या मनमिळावू, शांत आणि परोपकारी स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते. त्यांच्या जाण्याने पांचाळ कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली, सुना, नातू, नाती असा मोठा परिवार आहे.
आज दुपारी ४:०० वाजता होणार अंतिम संस्कार:
त्यांची अंतिम यात्रा आज बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक ४:०० वाजता त्यांच्या राहत्या घरावरून (विश्वकर्मा नगर, नायगाव बाजार) निघणार असून स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती व चिरशांती प्रदान करो आणि पांचाळ परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
'सत्यमेव जयते No 1 NEWS' परिवारातर्फे कै. व्यंकटराव पांचाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
शोकसंतप्त:
समस्त पांचाळ परिवार, आप्तेष्ट व मित्रपरिवार (ईकळीकर)
नायगाव बाजार, जि. नांदेड

«
Next
नवीनतम पोस्ट
»
Previous
थोडे जुने पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Leave a Reply