नायगाव बाजार (विशेष प्रतिनिधी):
विश्वकर्मा नगर, नायगाव बाजार येथील प्रभू विश्वकर्मा मंदिरात १७ सप्टेंबर रोजी प्रभू विश्वकर्मा पूजन दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगल प्रसंगी स्थानिक जागरूक तरुणांनी एकत्र येत संपूर्ण मंदिर परिसराची मनोभावे स्वच्छता केली.
त्यानंतर प्रभू विश्वकर्मा यांच्या मूर्तीचा विधिवत अभिषेक, पूजा-अर्चा करण्यात आली. मंदिरात दीपप्रज्वलन आणि धूप-अगरबत्ती लावून आरती करण्यात आली व प्रभू विश्वकर्मा चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करण्यात आली.
या धार्मिक व सेवाभावी कार्यात श्रीनिवास पोतदार, प्रमोद पोतदार, प्रद्युम्न पांचाळ, मन्मथ पाटील आणि कृष्णा चौधरी या युवकांनी सक्रिय सहभाग घेऊन संपूर्ण पूजनाची जबाबदारी पार पाडली. तरुणांनी दाखवलेली ही भक्ती, उत्साह आणि मंदिर स्वच्छतेचा पुढाकार पाहून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून त्यांचे कौतुक केले आहे. अत्यंत मंगलमय वातावरणात हा पूजन सोहळा संपन्न झाला.
निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS'
(रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नायगाव बाजार)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: