आमच्याशी संपर्क साधा

आमच्या बातम्यांबद्दल काही शंका असल्यास किंवा आपल्या भागातील बातम्या/समस्या मांडण्यासाठी आपण खालील क्रमांकावर किंवा पत्त्यावर संपर्क साधू शकता: शिवाजी पांचाळ तळणीकर : 7888113134 राजेश्वर पोतदार : 7385938333 ईमेल: SatyamevJayteNo1.news@gmail.com पत्ता: कै. बळवंतराव सराफा मार्केट, नायगाव बाजार, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड.

हा ब्लॉग शोधा

kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.

ब्लॉग संग्रहण

Games

Sports

» »Unlabelled » 'शिवनिश्चल'तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व अनाथ मुलांना दिवाळीनिमित्त घरपोच मदतनिधी!

नरसी (विशेष प्रतिनिधी - शिवानंद पांचाळ नायगांवकर):
आई-वडील नसणाऱ्या अनाथ, निराधार तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी 'शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट'च्या वतीने दिवाळी सणानिमित्त 'घरपोच मदत निधी' वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा प्रेरणादायी सोहळा शुक्रवार, दि. ०६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता आनंदीसदन (राज पॅलेस), नांदेड रोड, नरसी (ता. नायगांव, जि. नांदेड) येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी आणि कार्यक्रमाचे आयोजक शेतकरी पुत्र गजानन पाटील होटाळकर यांनी दिली आहे.
केवळ शिक्षणच नव्हे, तर मायेचा आधार देणार:
नांदेड जिल्ह्यातील अनाथ व निराधार मुलांना केवळ शिक्षणापुरती मदत न करता, त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने मायेचा आणि सुरक्षिततेचा आधार देण्याच्या पवित्र भावनेतून हे कार्य अविरतपणे सुरू आहे, असे प्रा. गोसावी सर यांनी स्पष्ट केले. अनाथ व गरजू मुलांना शालेय साहित्य, शैक्षणिक शुल्क आणि आवश्यक जीवनोपयोगी वस्तू देऊन त्यांचे पालकत्व स्वीकारण्याच्या या उपक्रमाचे हे १३ वे वर्ष आहे. ट्रस्टने आतापर्यंत १२७ मुलांचे पालकत्व यशस्वीपणे स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे.
प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती:
या सेवाभावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप सर उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून:
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन
जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाईत
उपविभागीय पोलीस अधिकारी (बिलोली) श्याम पानेगावकर
भास्कर पाटील भिलवंडे, उद्योजक मनोज पाटील मोरे, राजेश पाटील भिलवंडे, डॉ. शेख अनिस, डॉ. संतोष मोरे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
नरसी परिसरासह जिल्ह्यातील नागरिकांनी या सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

निर्भीड, निष्पक्ष आणि लोकाभिमुख पत्रकारिता – 'सत्यमेव जयते No 1 NEWS

«
Next
नवीनतम पोस्ट
»
Previous
थोडे जुने पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Leave a Reply